Viral Video: सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून लोक भावूक होत आहेत. व्हिडीओत तीन जिगरी दोस्त मजा-मस्ती करण्यासाठी म्हणून नदीवर गेले होते. यावेळी ते तिघे एकमेकांना मिठी मारत आयुष्यभर असेच एकत्र राहण्याचे वचन देत होते.पण, पुढच्याच क्षणी त्यांच्याबरोबर जे काही घडले, ते पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल, यावेळी तिघांनी एकमेकांना मारलेली ती मिठी ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची मिठी ठरली.
काळीज पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी असे म्हटले की, तिघांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते.ते तीन जिगरी दोस्त नदीत उतरले; ज्यात दोन मुली आणि एक मुलगा होता. पण, पुढच्या क्षणी काय होणार याची त्यांना कल्पनाही नव्हती. व्हिडीओमध्ये तिघेही एकमेकांना मिठी मारून कायम एकत्र राहण्याचे वचन देत होते; पण दुसऱ्याच क्षणी नदीने असेही काही रौद्र रूप धारण केले की, तिघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इटलीमध्ये एका नदीला भीषण पूर आला होता. त्यावेळी हे तिघेही नदीच्या आत उंच दगडावर अडकून पडले. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने नदी ओलांडणे खूप अवघड आहे हे त्यांना समजले. त्यानंतर ते तिघेही स्वत:चा बचाव करण्यासाठी एकमेकांना घट्ट धरून एका उंच दगडावर उभे राहिले. बचाव पथकाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, हे तिघेही नदीकाठच्या सुरक्षित अंतरापासून काही मीटर दूर होते; मात्र लाखो प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. तिघांपैकी एका मुलीने अग्निशमन दलाला मदतीसाठी फोन केल्याचे सांगितले जात आहे.
माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. कारण- त्यापूर्वीच ते पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून गेले. बचाव पथकाने त्यांच्या दिशेने दोरी फेकली; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ते त्यांच्या डोळ्यांसमोर पुराच्या पाण्यात बुडाले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.व्हिडीओ पाहणाऱ्या युजरने लिहिले, ‘त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘त्यावेळी त्यांच्या मनात काय चालले असेल याची मी कल्पना करू शकत नाही.’
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.