यावल :- तालुक्यातील अट्रावल येथील एका ४५ वर्षीय इसमाला एक वर्षासाठी जिल्ह्यातुन हद्दपारचे आदेश फैजपूर प्रांतांनी काढले आहे. दरम्यान सदर इसम हा हद्दपार असताना यावल शहरात असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. यावल पोलिसांच्या पथकाने सदर इसमास बुधवारी शेतकी संघाच्या मागुन ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हद्दपारीचे उल्लघन केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास गुरूवारी पुन्हा त्याला गुजरात राज्याच्या हद्दीत सोडले आहे.
अट्रावल ता. यावल येथील अशोक गोवर्धन तायडे उर्फ भाई वय ४५ यांना १७ एप्रिल २०२४ रोजी फैजपूर प्रांताधिकारी यांनी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
पोलिसांच्या पथकांनी त्यांना गुजरात राज्यातील सुरत शहरात सोडले होते. दरम्यान ते कुठल्याच प्रकारची परवानगी न घेता यावल शहरात दाखल झाले होते. व याबाबत यावल पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांना गोपनिय माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सहायक पोलिस निरिक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरिक्षक मुजफ्फर खान, हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलिस नाईक किशोर परदेशी, अशोक बाविस्कर, सुशील घुगे, योगेश खोंडे, अल्लौद्दीन तडवी, निलेश वाघ या पथकास तायडे यांचा शोध घेण्याच्या सुचना केल्या त्या नुसार बुधवारी दुपारी तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या मागुन ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध हद्दपार असतांना शहरात वावर केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने गुरूवारी दुपारी २ वाजेला गुजरात राज्यातील सुरत येथे सोडले आहे. सुरत पोलिसांकडे देखील या संदर्भातील नोंद करून त्यांना पुन्हा वर्षभर जळगाव जिल्ह्यात प्रवेश करू नये अशा सक्त सूचना देण्यात आले आहे. दरम्यान हद्दपार झालेले व्यक्ती जर तालुक्यात कुठे वावरत असतील तर त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी अशी आवाहन देखील यावल पोलिसांनी केले आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा