धरणगाव l प्रतिनिधी –
धरणगाव : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव जि.जळगाव येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश सत्र ऑगस्ट, २०२४ साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला ३ जून २०२४ पासून सुरुवात झाली आहे. शासकीय आय.टी.आय. ला प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना प्रवेश प्रक्रिया समजून घेण्यासाठी संस्थेत समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
धरणगाव शासकिय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेत विजतंत्री २० जागा, फिटर २० जागा, सदरील ट्रेड दोन वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम आहे. मेकॅनिक डिझेल-४८, कोपा-४८, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक-२०, ड्रेस मेकिंग- २०, कॉस्मोटोलॉजी-२४ अश्या एकूण २०० जागा उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात मेकॅनिक डिझेल, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, कोपा, कॉस्मोटोलॉजी, ड्रेस मेकिंग एक वर्षीय अभ्यासक्रमाचा कालावधी आहे. सदरील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे व इतर माहितीसाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सदर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जून , २०२४ सायं. ५ वाजेपावेतो अशी आहे. तसेच फॅशन टेक्नॉलॉजी या व्यवसायात संपूर्ण मुली व महिलांकरिता आहे. तरी कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था धरणगाव प्राचार्यांनी केले आहे. अधिक माहिती व प्रवेशासाठी प्राचार्य शासकीय आय.टी.आय. धरणगाव (०२५८८) २५२१२२ यांचेशी संपर्क साधावा.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.