यावल :- शहरातील भुसावळ टी पॉइंट जवळ असलेल्या बियर शॉपी मध्ये काम करणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाला बियर ची बॉटल अर्धवट निघाली असे सांगत तिघांनी त्याला मारहाण केली व त्याला जातीवाचक शिवीगाळ केली ही घटना दिनांक ८ जून रोजी रात्री घडली होती. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तिघांविरुद्ध ऍट्रॉसिटी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरात भुसावळ टी पॉइंट जवळ तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलात संगम बियर शॉपी आहे. या बियर शॉपी मध्ये बियर घेण्यासाठी पप्पू उर्फ अनिश छोटू पटेल हा गेला होता तेव्हा तेथे बियर अर्धवट निघाली असे सांगत त्याने व त्याच्यासोबत असलेल्या दानिश पटेल आणि अन्य एक जण अशा तिघांनी बिअर शॉपी वरील अनुसुचित जमातीच्या ३३ वर्षीय आदिवासी तरूणास जातीवाचक शिवीगाळ केली व त्याला मारहाण करून दुखापत केली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अधीक्षक अन्नपूर्णा सिंग या करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा