चार धाम यात्रेस जात असलेल्या भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर बस अलकनंदा नदीत कोसळली,१२ जणांच्या मृत्यू तर २३ जखमी.

Spread the love

झुंजार न्यूज नेटवर्क :- . रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ महामार्गाजवळ चार धाम यात्रेला निघालेल्या २३ यात्रेकरूंनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली. या भीषण अपघातातील मृतांचा अकडा १२ पर्यंत पोहचला आहे.वाहनातील २३ प्रवाशांपैकी काहींना वाचवण्यात आले असून, त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. रुद्रप्रयाग टेम्पो ट्रॅव्हलर अपघातातील मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे. तसेच या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले आहेत,

अशी अपडेट राज्य आपत्ती व्यवस्थापणाने दिली आहे.या अपघाता संदर्भात माहिती देताना, गढवालतचे पोलिस महानिरीक्षक करण सिंह नागन्याल यांनी सांगितले की, ‘टेम्पो ट्रव्हलर उत्तर प्रदेशातील नोएडा येथून रूद्रप्रयागच्या दिशेने जात होती. ती १५० ते २०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ९ जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. तर चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

या घटनेबाबत पोलीस अधीक्षकांनी काय सांगितले?

या घटनेबाबत रुद्रप्रयागचे एसपी डॉ. विशाखा अशोक भदाणे यांनी सांगितले की, रुद्रप्रयागमधील रंटोलीजवळ महामार्गावरून एक मिनी बस ट्रॅव्हलर खड्ड्यात पडल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा आढावा घेतला. सध्या स्थानिक लोक, जिल्हा पोलीस, एसडीआरएफ, अग्निशमन सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जल पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने बचावकार्य सुरू आहे.

मुख्यमंत्री धामी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले- रुद्रप्रयाग जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची दुःखद बातमी मिळाली आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.

सीएम धामी यांनी पुढे लिहिले – जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवंगतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा केदार यांना प्रार्थना करतो.

हे पण वाचा

टीम झुंजार