यावल :- तालुक्यातील पाडळसा गावाच्या शिवारात असलेल्या वीट भट्टी जवळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आम्ही दाखवून फुस लावून पळवून नेले आहे. ही घटना दिनांक १३ जून रोजी उघडकीस आली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शनीवारी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाडळसा ता. यावल या गावालगत वीट भट्टी आहे. या वीट भट्टीवर विटा थापण्याच्या कामासाठी आलेले कुटुंबातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी कसले तरी आमिष दाखवून, फुस लावून पळवून नेले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभीय मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मुलगी कुठेच मिळून न आल्याने फैजपुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोयुनोद्दीन सय्यद करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा