चाळीसगाव:- शहर पोलिसांनी अशोक भरतसिंग पाटील वय 54 वर्षे धंदा- ड्रायव्हर रा. प्लॉट नं.38, शिक्षक कॉलनी, चाळीसगांव हा चाळीसगांव शहरामध्ये अवैध रित्या गांजा विक्री करित असल्याबाबत माहीती मिळाल्याने मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती कविता नरकर (पवार) यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे तसेच मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांची परवानगी घेवुन आम्ही पोलीस निरीक्षक, संदिप पाटील तसेच
श्री जितेंद्र धनराळे, निवासी नायब तहसिलदार, चाळीसगांव, पोउनि/सुहास आव्हाड, पोहेकॉ/1119 सुभाष घोडेस्वार, पोहेकॉ/1720 राहुल भिमराव सोनवणे, पोहेकॉ/2897 विनोद विठ्ठल भोई, पोना/3136 महेंद्र प्रकाश पाटील पोकॉ/208 आशुतोष दिलीप सोनवणे, पोकॉ/552 ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पोकाँ/3363 पवन कृष्णा पाटील, पोकाँ/1419 विजय रमेश पाटील, पोकाँ/988 ज्ञानेश्वर विलास गिते, पोकाँ/1808 मनोज मोरसिंग चव्हाण, पोकॉ/2400 राकेश मुरलीधर महाजन, पोकॉ/2545 रविंद्र निंबा बच्छे, म.पो.शि.3279 स्नेहल मांडोळे, सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे.
तसेच फोटोग्राफर अनिकेत जाधव, वजन माप करणारे श्री प्रविण जगन्नाथ वाणी, रा. चाळीसगांव यांच्यासह बातमीतील इसमास सुमारे 10,06,300/- रुपये किमतीच्या 50 किलो 315 ग्रँम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण 22,06,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द दिनांक 16/06/2024 रोजी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड व पोकॉ/उज्वलकुमार म्हस्के नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.