संत समाज प्रबोधनाचे काम करीत असतात.-डॉ.तुळशीराम गुट्टे. राज्यस्तरीय साहित्य संमेलनात परिसंवाद.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल

एरंडोल- संत्कोन्त्याही एका जाती धर्माचे नसतात,संत समाजाचे प्रबोधन करीत असतात असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ.तुळशिराम गुट्टे यांनी केले.दादासाहेब पाटील महाविद्यालायाच्या पटांगणावर औदुंबर साहित्य रसिक मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दोन दिवसीय साहित्य संमेलनातील पाचव्या सत्रात “संत साहित्य आणि समाज प्रबोधन” या परिसंवादात ते बोलत होते.

यावेळी डॉ.डॉ.तुळशीराम गुट्टे यांनी संतानी त्यांच्यावर झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून समाज प्रबोधनाचे काम सुरु ठेवावे असे आवाहन केले.संत साहित्य अभिजात साहित्य असून मानवी जीवनाची समीक्षा संतांनी केली असल्याचे सांगितले.संतांनी चिकित्सक समाज निर्माण केला असून प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करणा-या व्यक्तीस संत म्हणावे असे सांगितले.मानवतेचा विकास हाच ग्रंथाचा खरा उद्देश असून ग्रंथांनी समाज प्रबोधनासारखे काम केल्याचे सांगितले.प्रत्येक व्यक्तीची कुणावर तरी श्रद्धा असल्याचे सांगितले.ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात संत साहित्याचा समावेश करावा अशी मागणी केली.चांगले आणि आदर्शाआयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने संत साहित्य आणि ग्रंथांचे वाचन करण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी कवी मनोहरआंधळे, प्रा.के.एम.पाटील, किर्गीस्तानाचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापिका क्षमा साळी यांनी सुत्रसंचलन केले.जावेद मुजावर यांनी आभार मानले.कार्यक्रमास निवृत्त तहसीलदार अरुण माळी,प्रा.वा.ना.आंधळे,साहित्यिक वि.दा.पिंगळे,विलास मोरे,पी.जी.चौधरी,प्रविण महाजन,संदीप ठाकूर,माधुरी कुलकर्णी,निंबा बडगुजर,प्रा.डॉ.केशव देशमुख,उद्योजक विजय जाधव,प्रा.डॉ.मिलिंद बागुल,प्रा.बी.एन.चौधरी यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी-एरंडोल येथे साहित्य संमेलनात मनोगत व्यक्त करतांना डॉ.तुळशीराम गुट्टे त्यांचेसोबत advt.मोहन शुक्ला, देवेंद्र साळी,ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी व मान्यवर

टीम झुंजार