नवी दिल्ली:- एकाने आपल्या मेव्हणीला महागडा मोबाईल गिफ्ट दिला होता. पण, मेव्हण्याच्या या भेटवस्तूमुळे पोलिस थेट भावजींच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक करून, त्याची रवानगी तुरुंगात केली. विमानात दागिने चोरी झाल्याचे एक प्रकरण नुकतेच घडले. या प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असून, पोलिस सखोल तपास करत आहेत. आरोपीने हे दागिने विकून आयफोन 15 प्रो मॅक्स मोबाईल खरेदी केल्याचे उघड झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही दिवसांपूर्वी आयजीआय विमानतळ पोलिसांनी विमानातून दागिने चोरल्या प्रकरणी राजेश कपूर नावाच्या एका गेस्ट हाउस मालकाला अटक केली होती. चौकशीदरम्यान, आरोपी राजेश कपूरने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.आयजीआय विमानतळ पोलिस उपायुक्त उषा रंगनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश कुमारने दागिन्यांच्या पैशातून त्याने एक आयफोन खरेदी केला होता आणि तो आयफोन त्याने लुधियाना येथे राहणाऱ्या त्याच्या मेव्हणीला भेट दिला होता. आरोपी राजेशने ही माहिती दिल्यावर पोलिसांचे एक पथक लुधियानाला पाठवण्यात आले.
पोलिसांनी लुधियानात छापा टाकून आरोपीच्या भावजीला अटक करून आयफोन जप्त केला. तसेच याप्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.विमानातून चोरलेले दागिने खरेदी करणाऱ्या संजय जैन या ज्वेलरला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतील शालिमार बाग येथे राहणाऱ्या संजय जैनचे चांदणी चौकात ज्वेलर्सचे दुकान आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर दागिने जप्त केले आहेत. जप्त केलेले दागिन्यांमध्ये सुमारे 250 ग्रॅम मोती, जॅकवर्ड्स, हिरव्या रंगाचे पन्ना, 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि इतर रत्नांचा समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.