यावल :- तालुक्यातील राजोरे या गावातील एका ३६ वर्षीय तरुणाची दोन अज्ञातांनी ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देऊ असे सांगून तब्बल २६ लाख ७४ हजारात फसवणूक केली आहे. सदर तरुणाला दोघांनी एक टेलिग्रामवरील लिंक पाठवुन त्याचा विश्वास संपादन करून रजिस्ट्रेशन करायला लावले आणि त्याचा विश्वासघात करून त्याची फसवणूक केली तेव्हा या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे जळगाव येथे तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तीने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजोरे ता.यावल येथील रहिवासी चेतन विनायक नेहेते वय ३६ या तरुणाला टेलिग्राम या सोशल वर दीपक राज व लेझर्ड एव्हीलीन नामक सोशल नेटवर्कवरील आयडी असलेल्या दोघांनी संपर्क साधला.व त्यांचा विश्वास संपादन करून आम्ही तुम्हाला ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देवु असे सांगत दिनांक १० मे २०२४ ते ०६ जून २०२४ या दरम्यान वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात २६ लाख ७४ हजार रुपयाची रक्कम घेतली.
आणि ती परत न करता त्याची फसवणूक केली. आपली फसवणूक झाली हे निदर्शनास आल्यानंतर चेतन नेहेते याने थेट जळगाव येथील सायबर पोलीस ठाणे गाठले आणि सोशल नेटवर्क वरील दीपक राज व लेझर्ड एव्हीलीन आयडी ओळख असलेल्या दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा