Viral Video : सध्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कधी नवरी नवरदेवाचे डान्स करतानाचे व्हिडीओ तर कधी कुटुंबातील भावनिक क्षण, कधी प्रथा परंपरा पाळतानाचे व्हिडीओ तर कधी उखाणा म्हणतानाचे व्हिडीओ समोर येतात.सध्या असाच एक अनोखा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी तिच्या बाबांबरोबर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. नवरीचा तिच्या वडिलांबरोबरचा डान्स पाहून तुम्हालाही तुमचे वडील आठवतील. काही लोकांना त्यांच्या त्यांच्या मुलीचे लग्न आठवतील.लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो.
नवरी नवरदेवाबरोबर त्यांच्या आईवडिलांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. विशेषत: मुलीच्या आईवडिलांसाठी हा दिवस खूप भावनिक असतो. अशाच एका वडिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जे लेकीच्या लग्नात तिच्याबरोबर मनमोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरी बाशिंग बांधून नाचताना दिसत आहे. तिच्याबरोबर तिचे बहिण भाऊ आणि विशेष म्हणजे वडील सुद्धा नाचताना दिसत आहे. वडील लेकीचा हा तुफान डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.त्यांना पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. ‘रानी माझ्या मळ्या मधी घुसशील का’ या मराठी लोकप्रिय गाण्यावर ते तुफान डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हाला पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहावासा वाटू शकतो. वडील लेकीच्या अनोख्या बॉन्डीची सगळीकडे चर्चा होत आहे.
utkarsha_padwal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘जेव्हा तुमचे वडील खूप चांगले डान्स पार्टनर असतात..’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, ‘ती तिच्या वडिलांप्रमाणे एक चांगला नवरा डिझर्व करते’ तर एका युजरने लिहिलेय, ‘खरंय वडीलांशिवाय छान आयुष्यात कोणता पार्टनर होऊ शकत नाही’ आणखी एका युजरने लिहिलेय,’भाग्यवान आहे बाई’ एक युजर लिहितो, ‘बाप लेकीचं किती जबरजस्त बॉन्ड आहे’ अनेक युजर्सनी या वडील लेकीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.