पत्रकार यांच्या उपस्थित “गुढीपाडवा” निमित्त फुटपाथ शाळेत वृक्षारोपण व शालेय साहित्य , ब्लॅक बोर्ड भेट देत “वाढदिवस” साजरा.

Spread the love

वर्धा प्रतिनिधी सचिन वैद्य

महापुरुषांनी जो विचार , मार्ग सांगितला त्या मार्गाने फार कमी लोक जातात : किरणजी ठाकरे

देवळी शहरातील तहसील कार्यालयासमोर फुटपाथ शाळेत भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे कोणताही सण असो वा उत्सव येथे प्रत्येक गोष्ट मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरी केली जाते यापैकीच एक सण म्हणजे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवसाने होते त्यामुळे “गुढीपाडवा” हा सण सास्कृतिक व धार्मिक गोष्टी सोबतच पर्यावरण व निसर्गाशी जोडला गेलेला आहेत म्हणून हा उपक्रम आयोजित केला तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले समाजसेवक , ज्येष्ठ पत्रकार किरणभाऊ ठाकरे , समीरभाऊ शेख , योगेशभाऊ कांबळे तर अध्यक्षा श्रीमती निर्मलाबाई वैद्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्या अनुषंगाने समीरभाऊ शेख यांनी सांगितले की आपण फूटपाथ शाळा चालवत आहात हा एक स्तुत्य व प्रशंसनीय उपक्रम आहे. तर योगेशभाऊ कांबळे यांनी सांगितले की शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करणे आजच्या काळात शिक्षण शिकविणे फार कठीण होत आहे कारण लहान लहान मुलांना मोबाईल अन्य व्यसनाचा छंद लागलेला दिसत आहे.

आणि निर्मलाबाई वैद्य (आई) यांनी सांगितले की समाजामध्ये अनेक वाढदिवस पाहते तो मोठ्या उत्साहाने साजरा करीत दिसतात पण माझ्या वाढदिवसानिमित्त ब्लॅक बोर्ड व इतर शालेय साहित्य देवून साजरा करीत आहेत तर लोकांनी या मुलांसाठी शक्य होईल तेवढी मदत करावी अशी विनंती केली तसेच किरणभाऊ ठाकरे यांनी सांगितले की बहुजन घटकातील वंचित समाजाच्या अनेक समस्या आहेत पण खरंतर आजच्या युगात समाजामध्ये पैशाच्या जोरावर समाजकार्य अनेक लोक करीत दिसतात आणि त्यांना प्रसिद्धी , प्रकाश झोत मिळते परंतु महापुरुषांनी जो विचार , मार्ग सांगितला त्या मार्गाने फार कमी लोक जातात असे थोडक्यात सांगत हितगुज केले.व सर्वांना नास्ता वाटप करीत आनंद व्यक्त केला तसेच भारत सामाजिक विकास

ग्रुप देवळीचे सचिन वैद्य संचालन तर आभार सुवर्णा वैद्य यांनी मानले. यशस्वीतेसाठी मीनल तिवारी , रेणुका दुरगुडे आणि विद्यार्थी रोशन शिदे,गजानन पवार ,श्रीराम पवार ,अजय पवार ,दीपक पवार ,योगेश तांबे ,निशा तांबे , दुर्गा पवार ,पूजा पवार , आरती पवार , साजन , तनुश्री व हर्षल दुरबुडे इत्यादी उपस्थित होते त्याचप्रमाणे इतर लोकांनी सहभाग घेत सहकार्य केले.

टीम झुंजार