दिल्ली:- येथील जेएनयूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेएनयूमधील एका प्राध्यापकावर एका विद्यार्थिनीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. प्राध्यापकाने तिला त्रास दिल्यानं तिला कॅम्पस सोडण्यास भाग पाडले गेले.विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, प्राध्यापक तिला चिनी भाषेमध्ये अश्लील मेसेज पाठवत असे आणि तिला त्यांच्या चेंबरमध्ये एकटीला भेटण्यासाठी बोलावत असे. 20 वर्षीय विद्यार्थी जेएनयूच्या चायनीज आणि साउथ ईस्ट एशियन स्टडीज सेंटरमध्ये शिकत होती. आठवडाभरापूर्वी दिल्ली पोलिसांनी या प्राध्यापकावर कारवाई सुरू केली आहे.
आरोपी प्राध्यापकांना निश्चित तारखेला तपास अधिकारी किंवा न्यायालयासमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. प्राध्यापक तिच्या वर्गमित्रांना तिचा पत्ता विचारायचा असा आरोपही विद्यार्थिनीने केला आहे. याशिवाय तिला कॅम्पस सोडण्यास जबरदस्ती करण्यात आली, असाही आरोप विद्यार्थिनीचा आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पीडितेने वसंत कुंज (उत्तर) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राध्यापकाने विद्यार्थ्यींनीला पाठवलेल्या चीनी भाषेतील व्हॉट्सॲप मेसेजची कागदोपत्री पुराव्यांचे विश्लेषण करण्यात आले आणि कलम 164 सीआरपीसी अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला. निवेदनाव्यतिरिक्त तिच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. पुरेशा पुराव्याच्या आधारे आम्ही आता प्राध्यापकाला ताब्यात घेतले असून नंतर आरोपपत्र दाखल केले जाईल असंही पुढे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.महिलेने 30 एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्राध्यापकाने तिला ‘सतत मेसेज आणि कॉल’द्वारे त्रास दिल्याचा आरोप आहे.
तो तिला अश्लील कविता पाठवायचा आणि तिला एकटीने येऊन भेटण्यासाठी धमकी देत असे. विद्यार्थिनीने आरोप केला की, जेव्हा तिने प्राध्यापकाने भेटण्यासाठी नाकार दिला तेव्हा त्याने तिला पेपरमध्ये नापास करण्याची धमकी दिली. पोलिसांनी सांगितले की, प्राध्यापकाने तिचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी तिच्या वर्गमित्रांनाही त्रास दिला.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.