गंभीर आजार असल्याचं समजताच धक्काने आईचा मृत्यू,अन् आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मुलाने रेल्वेखाली झोकून संपविले जीवन.

Spread the love

मुंबई: आपल्याला गंभीर आजार असल्याचं समजताच त्या धक्काने आईचा मृत्यू झाला, तर आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मुलाने स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेला तरूण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठमुंबरी गावचा असून त्याने घाटकोपरमध्ये रेल्वेखाली जीव दिला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मिठमुंबरी-खालचीवाडी येथे सुषमा गावकर यांचा मृत्यू झाला. ही बातमी त्यांच्या मुलाला समजताच त्या धक्क्याने हितेश गावकर या 27 वर्षीय युवकाने घाटकोपर येथील रेल्वे रुळावर झोकून देत आत्महत्या केली.

मायलेकाचे एकाच दिवशी मानासिक धक्यातून निधन झाले.सुषमा गावकर यांना गंभीर आजार झाल्याचे समजताच त्यांचा मानसिक धक्क्याने मृत्यू झाला होता. हे वृत्त हितेशला समजताच त्यानेही मानसिक धक्क्यातून आत्महत्या केली. गावकर कुटुंब मुंबईतील लालबाग येथे छोटा खानावळीचा व्यवसाय करत होते. हा व्यवसाय सांभाळून गावाकडील हापूस आंब्याचा व्यवसाय देखील करत होते. या मायलेकाच्या मृत्यूने मिठमुंबरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं

एका मराठा आंदोलकाने आयुष्याची अखेर करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद देठे असे या तरुणाचे नाव आहे. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रसाद देठे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे.

प्रसाद देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे. लिहिलेल्या चिठ्ठीत ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’, याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार