पारोळा l प्रतिनिधी
पारोळा :- येथील शिव कॉलनी मध्ये रहिवासी असलेल्या महिला आपल्या काकांच्या अंत्यविधीसाठी गेले असता बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये लंपास केले तरी तर तीन घरे देखील फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे दिनांक 18 रोजी पारोळा शहरातील शिव कॉलनी परिसरात राहत असलेले सैन्य दलातील जवानाच्या पत्नी अश्विनी यशवंत पाटील यांच्या काकांचे १८ रोजी निधन झाल्याने ते घराला कुलूप लावून मुलांसह नरडाणा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे अंत्यविधीसाठी गेले होते
त्या ठिकाणी मुक्कामी राहिले असताना बंद घराचा फायदा उचलत मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा कळीकोंडा तोंडून घरात प्रवेश केला घराततील कपाटाचे सामान अस्ताव्यस्त करत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने त्यात चैन, अंगठी चांदीच्या वस्तू, रोख रुपये सुमारे दीड लाख रुपयाचा ऐवज घेऊन पसार झाले
चोरटे एवढ्यावरच न थांबता आजूबाजूला राहत असलेले प्रभाकर रूपा राठोड, रुखमाबाई गोपाल महाजन, जोरसिंग मंगतू पवार यांचे देखील बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश करून काही रोख रुपये इतर वस्तू चोरून नेल्याचे समजते मात्र ही मंडळी बाहेरगावी असल्याने किती रक्कम चोरीला गेली आहे हे अद्याप कळू शकले नाही म्हणून याबाबत पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम