घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपयोजनेच्या मुख्याधिकारीना केल्या सूचना
अमळनेर:- दि 18 रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्स मधील भिंत अचानक पडल्याने संपुर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरून यात बेसमेंट मधील व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले होते.यासंदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांनी पाहणी करून पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी पालिकेच्या मुख्याधिकारी यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
सदर कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेली गटार तुंबत असल्याने पाण्याचा निचरा होण्यास जागा मिळत नाही यामुळे जोरदार झालेल्या पावसाचे पाणी कॉम्प्लेक्सच्या संरक्षण भिंतीत मुरल्याने भली मोठी भिंत कोसळून संपूर्ण पाणी कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट शिरले व तेथील सारी दुकाने जलमय होऊन व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले ही बाब दुकानदारांनी स्मिता वाघांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी तातडीने पालिकेच्या मुख्याधिकारी तुषार नेरकर सदर गटार मोठी करून त्यात मोठा पाईप टाकण्याच्या सूचना केल्या,
श्री नेरकर यांनी देखील लागलीच काम सुरू करण्याची ग्वाही खासदारांना दिली. दरम्यान घटनेच्या दिवशी परिस्थिती बिकट असताना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवा देत रात्री साडे तीन वाजेपर्यंत पंप लावून पाणी काढल्याने स्मिता वाघांनी पालिका कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.व ज्या व्यावसायिकांचे यात मोठे नुकसान झाले त्यांना धीर दिला.
यावेळी पाटील ऍग्रो चे प्रशांत पाटील,धवल ऑटो चे धवल शाह,जमिनी टेलर्स चे गुलाबराव पाटील,धनश्री सेल्स चे भरत जावदेकर,अक्षरा प्लायवूड चे रुपेश कोतवाल,हिंगलाज मसाज थेरपी सेंटरचे विजयकुमार ढवळे,बालाजी इलेक्ट्रिक चे धनराज बडगुजर यासह इतर व्यावसायिक तसेच भाजपाचे शहराध्यक्ष विजय राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख,माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस राकेश पाटील, देवा लांडगे, राहुल चौधरी, हिरालाल पाटील आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.