एरंडोल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ग्रामसेवक पदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी बुधवारी दि. २६ जून रोजी दुपारी ३ वाजता काढले आहे. यामुळे जळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबतचा पाठपुरावा उपसरपंच अनिल आत्माराम पाटील यांनी केला होता.
वावडदा येथील ग्रामसेवक मिलिंद मिठाराम बाऊस्कर यांनी पदावर कार्यरत असताना मासिक सभेची नोंद प्रोसिडिंग बुकात वेळेवर न घेणे, ग्रामसभेची नोंद न ठेवणे, पाणीपुरवठा योजनेची व ग्रामनिधीची रक्कम परस्पर खर्च करून अपहार करणे, पंधरावा वित्त आयोग अंतर्गत अपहार करणे, इत्यादीप्रमाणे अनियमतता केल्याचे चौकशीअंती दिसून आले आहे.
त्याबाबतचा अहवाल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दि. १६ मे २०२४ रोजी सादर केला होता.
वावडदे येथील सरपंच राजेश नारायण वाडेकर यांच्यावरही मा. विभागीय आयुक्त नाशिक तसेच मा. जिल्हाधिकारी जळगाव या दोन्ही ठिकाणी कारवाई तक्रार आहे
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






