४२ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह प्रदान
पहूर ता.जामनेर( ता.२८ ):- विद्यार्थ्यांनी जिद्दीने यश मिळवावे , आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी ,असे प्रतिपादन पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी केले .महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते .
प्रारंभी सातवीच्या विद्यार्थिनींनी समूह नृत्याने उपस्थितांचे स्वागत केले . नववीच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन सादर केले . सोहळ्याचे अध्यक्ष स्थान महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी भूषविले . याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पहूर कसबेच्या सरपंच आशाताई जाधव होत्या .
सुरुवातीला महात्मा फुले , सावित्रीबाई फुले व डॉ . हेडगेवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले . प्रास्ताविक मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे यांनी केले . प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांनी अहवाल सादर केला . ॲड . एस .आर .पाटील , निवृत्त केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम पाटील , सचिव भगवान घोंगडे, कोषाध्यक्ष शंकर घोंगडे, संचालक लक्ष्मण गोरे,अशोक बनकर, ज्ञानेश्वर लहासे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, माजी सरपंच देवकाताई बनकर , शंकर जाधव , उपसरपंच शरद पांढरे ,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमावत , योगेश भडांगे ,विक्रम घोंगडे , अर्जुन लहासे , श्रावण घोंगडे ,ज्ञानेश्वर रोकडे , प्रभाकर गीते , दीपक जाधव , संतोष चौधरी , योगेश बनकर , तुकाराम जाधव , सचिन कुमावत आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
गुणवंतांचा गौरव
क्रीडा क्षेत्रात तायक्वांदो , ॲथलेटिक्स , खो -खो आधी स्पर्धांमधील विजेत्यांसह शासकीय चित्रकला परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व विज्ञान प्रदर्शनातील बाल संशोधकांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले .
४२ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह
जामनेर येथील आनंदयात्री परिवाराचे सदस्य गणेश राऊत आणि ज्ञानवेद प्रबोधिनीचे अध्यक्ष शंकर भामेरे यांच्यातर्फे मोनाली बनकर , जागृती चौधरी , गायत्री मोहणे यांच्यासह १ली ते १०वीपर्यंतच्या अनुक्रमे प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या ४२ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
गरजू विद्यार्थिनींना गणवेश वाटप
डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयाची दिवंगत विद्यार्थिनी बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे हिच्या स्मृती प्रित्यर्थ ५ गरीब मुलींना शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्यातर्फे शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी केले . क्रीडा विभाग प्रमुख हरिभाऊ राऊत यांनी आभार मानले .यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका कल्पना बनकर , ज्येष्ठ शिक्षक अमोल क्षीरसागर यांच्यासह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.