यावल :- तालुक्यातील चिंचोली येथील माहेर असलेल्या २१ वर्षीय विवाहितेचा पतीस कार घेण्या करीता माहेरून चार लाख रुपये आणावे म्हणून छळ करण्यात आला. व विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन माहेरी सोडून देण्यात आले. ही घटना दिनांक १५ मार्च २०२२ पासून ते ३० मार्च २०२३ दरम्यान घडली. तेव्हा विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात बुधवारी तीन जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचोली ता. यावल येथील माहेर असलेल्या पूजा राहुल सैंदाणे वय २१ वर्ष या विवाहितेने यावल पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह १५ मार्च २०२२ रोजी कुरवेल ता. चोपडा येथील रहिवाशी राहुल कुंजुलाल सैंदाणे यांच्यासोबत झाला होता. विवाह नंतर दिनांक ३० मार्च २०२३ दरम्यान पती राहुल सैंदाणे, सासू कल्पनाबाई सैंदाणे रा. कुरवेल व मामसासरे ज्ञानेश्वर सोनवणे रा. नंदूरबार या तिघांनी विवाहितेला पतीला कार घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आणि तिचा छळ करीत माहेरी सोडून दिले.
तेव्हा प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा