यावल :- तालुक्यातील आडगाव शेत शिवारात रविवारी दुपारी शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांना भला मोठा अजगर दिसला तेव्हा त्यांनी त्याला न मारता चिंचोली येथील सर्प मित्रांना बोलावले व सर्प मित्रांनी अजगरला सुरक्षीत सातपुड्याच्या जंगलात सोडून जिवदान दिले आहे.
आडगाव ता.यावल या गावालगत नामदेव भाऊलाल कोळी यांचे शेत आहे या शेतात रविवारी दुपारी एक भला मोठा अजगर शेत मजुरांना दिसला. तेव्हा त्यांनी चिंचोेली येथील सर्प मित्र अरुण कोळी, शामा कोळी, तसेच सातपुड्यातील वन मजूर किरण तडवी यांना माहिती दिली तेव्हा सर्प मित्र शेतात आले व त्यांनी या अजगरला सुरक्षीत पकडून सातपुड्याच्या जंगलात सोडून जिवदान दिले आहे. अजगरला पाहण्यासाठी शेत मजुरांनी गर्दी केली होती.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






