यावल : यावल शहरातील तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी च्या निवडणुकीत महिला गटातून शारदा चौधरी, मनीषा नेहते यांची बिनविरोध निवड झाली आहे.महिला राखीव असलेल्या दोेन जागेवर तीन अर्ज प्राप्त झाले होते व त्यातील एका महिलेने रविवारी माघार घेतल्याने महिला राखीव दोन्ही जागा बिनविरोध ठरल्या येथील तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी येथे निवडणूक जाहीर झाली असून यात महिला राखीव गटातून तिन उमेदवारांनी उमेदवार अर्ज दाखल केले होते.
यात न्यू इंग्लिश स्कूल भालोद येथून मनीषा शिरीष नेहते, श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चुंचाळे येथून शारदा सुधीर चौधरी, मुन्सिपल हायस्कूल फैजपूर येथील नीलिमा होले, यांनी महिला राखीव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महिला राखीव जागेत ना दोन महिला संचालक निवडून द्यायचे असल्याने म्हणजे स्कूल फैजपूर येथील नीलिमा होले यांनी माघार घेतल्याने शारदा सुधीर चौधरी व मनीषा शिरीष नेहते दोघांची पतपेढीच्या संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.
या अविरोध निवडीसाठी जळगाव जिल्हा शिक्षक शिक्षकेतर पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरुड सर, जळगाव पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे, अजय पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जयंत चौधरी, मुख्याध्यापक संघाचे डि.व्ही.चौधरी, व्ही.जी.तेली, डी.व्ही.पाटील, पी.बी. पाटील,के.टी.तळेले,भुसावळ शिक्षक पतपेढी चे संचालक चेतन तळेले,पी.एस. नेमाडे , किरण झांबरे, मनोज फालक,असलम शेख सर, अशफाक सर, अजित पाटील ,गणेश पाटील, सतीश पाटील, कैलास चौधरी, किशोर चौधरी, एस.एस.पाटील, दीपक पाटील, निलेश पाटील, व्ही. बी.पाटील, सुधीर चौधरी या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार पॅनलचे जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध व्हावेत व पतपेढीचा निवडणुकीसाठी होणारा खर्च वाचावा यासाठी प्रयत्न केले.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम