.
जळगाव प्रतीनिधि। तालुक्यातील जळके गावातील स्टेट बँकेचे एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून मशिन फोडण्याचा प्रयत्न फसला आहे. मशीन फोडण्यात यश न आल्याने चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला आहे।. ही घटना आज पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे
याबाबत थोडक्यात असे की, जळके गावातील वावडदा रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीमएम आहे. येथे मध्यरात्री चोरट्यांनी एटीएमचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
यानंतर चोरट्यांनी एटीएममध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, चोरट्यांकडून एटीएम मशिन न फुटल्याने एटीएम मशिनमधील कॅश सुरक्षीत राहिली असून चोरटयांचा प्रयत्न फसला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली