यावल : तालुक्यातील आडगाव येथील माहेर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेचा पतीसह सहा जणांनी छळ केला. माहेरून पतीला कार घेण्यासाठी ३ लाख रुपये आणावे असा तगादा लावला व पैसे आणले नाही म्हणून तिला शाररिक व मानसिक त्रास देऊन माहेरी सोडून दिले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाणे शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगाव ता. यावल येथील माहेर असलेल्या शबनम रोशन तडवी वय ३० वर्ष या विवाहितेने यावल पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीला कार घेण्या करीता माहेरून ३ लाख रुपये आणावे यासाठी पती रोशन तडवी,सासु रशिदा तडवी, रफिक तडवी, आशा तडवी, मुनाफ तडवी व हिना तडवी या सहा जणांनी तिचा छळ केला.
व पैसे आणले नाही म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला माहेरी पाठवून दिले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा