मुंबई : सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.
दरवर्षी 10 ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे डख म्हणाले. राज्यात 4 ते 11 जुलैपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आपण वर्तवला होता असे डख म्हणाले. दरवर्षी 10 ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो. यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. यावर्षी जुलै महिन्यात दोन लो प्रेशर येणार आहेत, त्यामुळं चांगला पाऊस पडणार आहे. राज्यात 13 जुलैपासून 25 जुलैपर्यंत दोन कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. त्यामुळं चांगला पाऊस पडणार आहे.
नदी नाले ओढू भरुन वाहणार
बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी फवारणी करावी असे पंजाबराव डख म्हणाले. एकदम राज्यातील पाऊस कमी होणार नाही. भाग बदलत पाऊस पडत राहणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. मात्र, 7, 8 आणि 9 जुलैला राज्यात मुसळधार पाऊस पडून नदी नाले ओढू भरुन वाहणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले.
जळगाव जिल्ह्याला अलर्ट जारी
जळगाव जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून हलक्या ते मध्यम पाऊस कोसळत आहे. यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही जळगावकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. सकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसात आहे. आज जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४