लखनऊ :- सून आणि सासू यांच्यातील नातं हे आई आणि मुलीसारखं असतं, असं म्हणतात. लग्नाआधी प्रत्येक आई आपल्या मुलीला सांगते, की आता तुझ्या सासूमध्ये तुझ्या आईचं रूप पाहा. मात्र सासू आणि सून यांच्यातील नातेसंबंधाची एक अतिशय अजब घटना समोर आली आहे.यात एका सासूने आपल्याच सुनेसोबत संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली. तर, तिच्या पतीनेही हुंड्यासाठी शारीरिक शोषण केल्याचा आरोप सुनेनं केला आहे.
सुनेचा आरोप आहे, की पतीही महिलेची मुलं आपली नसल्याचं म्हणतो.आग्रा येथील मुलीचं डिसेंबर 2022 मध्ये गाजीपूर येथे लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं, पण नंतर पतीने आणखी हुंड्याची मागणी सुरू केल्याचा आरोप सुनेने केला आहे. त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्याने शारीरिक अत्याचार सुरू केले. सासू आणि नणंदेनंही तिच्या लग्नाचे दागिने काढून घेतले. पती आपल्या दाजीसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप सुनेने केला आहे.तिने हे सगळं करण्यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली.
नवराही तिची मुलं आपली नसल्याचं म्हणतो. सुनेनं सासू आणि नणंद यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. आपल्या सासूला आपल्यासोबत समलैंगिक संबंध ठेवायचे होते, असं सुनेनं पोलिसांना सांगितलं.तिने विरोध केल्यावर सासू तिला मारहाण करते. नणंद आणि सासूने मिळून तिच्याकडील सर्व कपडेही हिसकावले आहेत. बरेच दिवस ती फक्त एकाच ब्लाउज आणि पेटीकोटमध्ये राहिली. लेस्बियन सासूनेही संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पाच वेळा ब्लेडने तिचा हात कापला. आता पीडितेने जगदीशपुरा पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हे पण वाचा
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.






