जळगाव :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा व्यापार करणा-या पिता पुत्रास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. रमेश जेठानंद तेजवाणी व दिपक रमेश चेतवाणी (दोघे रा.सिंधी कॉलनी, जळगाव) अशी या पिता-पुत्रांची नावे आहेत. हे पिता पुत्र जळगाव शहर तसेच जळगाव जिल्हयात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याचा व्यापार करत होते. दिपक चेतवाणी याच्या विरुध्द जळगाव शहर तसेच जळगाव जिल्हयात गुटखा बाळगणे, गुटख्याची वाहतुक करणे असे एकुण सात गुन्हे दाखल आहेत.
तसेच रमेश चेतवाणी याच्याविरुध्द एकुण चार गुन्हे दाखल आहेत. दोघा पिता पुत्रांविरुद्ध दाखल गुन्हे बघता तसेच त्यांची कृती सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणारी ठरत होती. तसेच त्यांच्या कृतीमुळे तरुण पिढी प्रतिबंधीत गुटख्याच्या व्यसनाधिनतेकडे वळत होती. अवैध गुटखा विक्रीतुन मिळणा-या पैशाच्या बळावर त्यांची सिंधी कॉलनी व परीसरात दहशत वाढत होती. त्यांच्या विरुद्ध वेळोवेळी कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात फरक पडत नव्हता.त्यामुळे दोघा पिता-पुत्रांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन कडून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. सन 2019 पासुन दोघे जण महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची विक्री व वाहतुक करत होते. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, स. फौ. अतुल वंजारी, युनुस शेख, पो.ना. सचिन पाटील, पो.ना. योगेश बारी, पो.कॉ. साईनाथ मुंढे, पो.कॉ. छगन तायडे, पो.कॉ. किरण पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. दोघा-पिता पुत्रांना मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथे हद्यपार कालावधीत राहण्याकामी सोडण्यात आले आहे.
हे पण वाचा
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.