Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ कधी हास्यास्पद असतात, कधी प्रेरणादायी तर कधी मनाला हळवे करणारे असतात.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओजच्या गराड्यात युजर्सची मात्र फुल्ल ऑन एन्टरटेनमेन्ट होते यात शंका नाही. बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ हे पती पत्नीमधील असतात. अशा व्हिडीओज ना देखील नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत असते. आता सोशल मीडियावर पती पत्नीच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अगदी हातात विट घेऊन हे पती पत्नी हाणामारी करीत आहेत. नक्की काय आहे हा व्हिडीओ पाहूया…
काय आहे व्हिडीओ ?
या व्हिडिओमध्ये एक जोडपे त्यांच्या घराबाहेर एकमेकांसोबत भांडताना दिसत आहे. त्यावेळी अचानक पती त्याच्या पत्नीच्या डोक्यात मारण्यासाठी हातात वीट घेतो; पण नंतर हातातील वीट खाली फेकून पत्नीची बॅग घेऊन तिला घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्याची पत्नी फेकलेली वीट स्वतःच्या हातात घेते आणि त्याच्या डोक्यात मारण्यासाठी जाते. पत्नी डोक्यात वीट मारणार हे दिसताच पती खूप घाबरतो. इतक्यात ती वीट चुकून तिच्या हातातून खाली पडते. त्यावेळी पती तिला पकडतो आणि बेदम चोप देतो.
यावेळी त्यांची मुलगी हा सर्व प्रकार घरातून पाहत, ती मोठमोठ्याने हसताना दिसत आहे. हा सर्व विचित्र प्रकार पाहता, हे सर्व नाटक व्हिडीओ बनविण्यासाठी केल्याचे दिसत आहे.हा व्हिडीओ @riya_rajpoot16 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही मिळाल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहले आहे की, “गेम चेंजर.” दुसऱ्या एका व्यक्तीने लिहले आहे , “ही बॅग कोणाची आहे?” तर दुसऱ्या एका व्यक्ती आपली हकीकत सांगत “मी आणि माझी बायकोपण असंच भांडतो.” असे म्हंटले आहे. तर व्हिडीओ (Viral Video) मध्ये दिसणारी मुलगी हे भांडण एन्जॉय करीत असल्याचे दिसत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा