श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त धरणगाव केंद्रात मांदियाळी व महाआरती

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
धरणगाव :
येथील श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक व बालसंस्कार सेवा (दि. प्र.) केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाच्या उत्सव ( मंदियाळी ) मोठ्या संख्येने भाविक सेवेकर्यांच्या उपस्थित आनंदाने संपन्न झाला. प्रत्येक सेवेकर्‍याने आपल्या घरून भोजनाचा डबा आणला. सर्व अन्न एकत्र करून महाराजांना नैवैद्य दाखविण्यात आला.व सेवेकर्‍ यांसाठी मांदियाळी करण्यात आली. तालुक्यातील सर्व साप्ताहिक सेवा व बालसंस्कार केंद्रानी सहभाग घेऊन महाराजांचा चरणी सेवा रुजू केली. सर्वच महिला व पुरुष सेवेकर्यांनी श्री दुर्गा शप्तशती व श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे सामुदायिक वाचन करून पारायण केल्याचे पुण्य मिळविले. नैवैद्य महाआरती सकाळी 10.30 वाजता जळगांव चे आयकर विभागाचे सहआयुक्त श्री.विशाल मकवाने साहेबांचा हस्ते करण्यात आली.

तालुक्यातील सर्व पंचक्रोशीतील सर्व सेवेकरी मंदियाळीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. केंद्र प्रमुख श्री राकेश मकवाने तसेच जळगांव चे आयकर विभागाचे सहआयुक्त श्री विशाल मकवाने साहेब यांनी सर्व सेवेकरी यांना श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध केले. त्यामुळे प्रत्येकाचा चेहऱ्यावर प्रसन्नतेचे वातावरण होते. हा मार्ग नविन सेवेकरींना सहज सोप्या भाषेत समजावून सांगितला.

महाआरती नंतर सर्व सेवेकर्यांना महाप्रसाद वाटप करून घराकडे पुण्याचा साठा घेऊन गेलेत. काही महिलांनी भजन म्हणून सेवा रुजू केली.
या उत्सवासाठी केंद्रातील सर्व सेवेकरींनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

टीम झुंजार