यावल :- शिक्षण पुरे झालं, हातमजुरी कर, नोकरी वशिल्याशिवाय मिळणार नाही असे सर्व सामान्य कुटुंबातील तरुणांना समाजातुन बोल ऐकवले जातात. मात्र, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम या तीन गोष्टीने सर्व काही साध्य करता येतं हे यावलच्या २१ वर्षीय गणेश भोईटे या तरुणाने सिद्ध करून दाखवले शहरातील शिवाजी नगरात हातमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील या तरूणाने पहिल्याच प्रयत्नामध्ये महाराष्ट्र पोलीस दल भरतीत यश मिळवले आहे.
यावल शहरातील शिवाजीनगर भागात सामान्य हातमजुरी करणारे श्रीकांत भोइटे यांचे कुटुंब यात भोईटे व त्यांची पत्नी हातमजुरी करतात त्यांना दोन मुलं मोठा गौरव भोईटे वय २२ तर लहान गणेश भोईटे वय २१ हे दोघं शिक्षणासह सैन भरती व पोलीस भरतीची तयारी गेल्या दोन वर्षांपासुन करीत होते. शिक्षण झाल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणांना समाजातुन खडे बोल ऐकायला मिळत होते या भरपूर झाले शिक्षण, आता कामाला जा.. नोकरी वशिल्याशिवाय मिळत नाही असे बोल कानी पडायचे मात्र, जिद्दीने यशाकडे वाटचाल करीत सतत चिकाटीने परिश्रम घेत गणेश भोईटे हा पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस घरात भरती झाला आहे.
१० जुलै रोजी त्याची निवड जाहीर झाल्यानंतर शिवाजी नगरात जल्लोषात त्याच्या मित्रमंडळींनी गुलाल उधळत त्याची मिरवणूक काढली व आई-वडिलांनी त्याला आशीर्वाद दिले जिद्दीमुळे सर्व काही शक्य होऊ शकते हे या तरुणाने दाखवून दिले आहे.कठोर परिश्रम हाचं यशाचा मार्ग. सामान्य, गरीब कुटुंबातील तरूणांसाठी कठोर परिश्रम हाचं यशाचा मार्ग आहे. आपण आपल्या जिवनातील उम्मेदीच्या वयात आपल्या कुटुंबाप्रति आपली जवाबदारी ओळखत करीअरच्या दृष्टीने जिद्द,चिकाटीने परिश्रम घेत ध्येय निश्चित करून त्याकडे वाटचाल करावी असे प्रसंगी गणेश भोईटे याने सांगीतले.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा