बनावटी गावठी पिस्टल (कट्टा) जवळ बाळगणाऱ्या रेकॉर्ड वरील विधी संघर्ष बालकास चाळीसगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

Spread the love

चाळीसगाव :- श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक, जळगाव यांचे तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती कविता नेरकर मँडम व मा. सह.पोलीस अधिक्षक श्री . अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड वरील गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवणेकामी , चोरीच्या गुन्हयांवर आळा घालणेकामी चाळीसगाव शहर पो स्टे तर्फे गुन्हेशोध पथक तयार करून, पथकातील कर्मचारी यांना मार्गदर्शपर सूचना देण्यात आल्या आहेत ..

सदर पथकातील कर्मचारी 1) रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार यांना नियमित चेकिंग, 2) बस स्टॅन्ड , रेल्वे स्टेशन , दर्गा परिसरात येणाऱ्या प्रवास्यांची रात्रौ वेळी चौकशी करून त्यांचे चाळीसगाव शहरात येण्याचे कारणाबाबत सखोल चौकशी 3) शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई 4) बँक सराफ बाजारात लक्ष ठेवणे, 5) बाजार समिती चाळीसगाव येथे शनिवारी बाजारदिवशी गस्त ठेवणे, 6) नियमित हॉटेल व लाँजेस चेक करणे, 7) कोणताही गुन्हा घडला तर तात्काळ आरोपीचा शोध घेणे इ कार्य बजवत असतात तसेच रात्रौगस्त वरिल कर्मचारी हे चाळीसगाव शहर परिसर सेक्टर प्रमाणे विभागणी करुन संबंधीत सेक्टर मध्ये सतर्कतेने गस्त करत असतात.

त्याप्रमाणेच रात्रगस्त मध्ये पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी काल दिनांक 15/07/2024 रोजी 23.30 वाजेपासुन आज दिनांक 16/07/2024 चे सकाळी 05/00 वाजेपर्यंत चाळीसगाव शहर पो स्टे गुन्हेशोध पथकाचे पोहेकाँ योगेश बेलदार , पोहेकाँ अजय पाटील ,पोहेकाँ नितेश पाटील , पोकॉ निलेश पाटील, पोकाँ अमोल भोसले , पो.काँ गणेश कुवर , पो.काँ शरद पाटील , पो.काँ मोहन सुर्यवंशी ,पो.काँ सतीष पाटील यांना रात्रगस्त पेट्रोलींग कामी नेमलेले होते. त्यांना रेकॉर्ड वरील गुन्हेगार मिळुन आल्यास त्याची सखोल चौकशी करण्याकामी सुचना दिल्या होत्या.

सदर रात्रगस्त वरील पोलीस अंमलदार पोहेकाँ योगेश बेलदार व पोकॉ/ निलेश पाटील यांना हिरापुर रोड , रेल्वे स्टेशन परिसर , पवारवाडी , सेक्टर पेट्रोलींग नेमण्यात आले होते . ते गस्त करित असतांना चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर पोलीस चौकीच्या बाजुला असणाऱ्या साई पान सेन्टर समोर रेकाँर्ड वरील गुन्हेगार विधीसंघर्ष बालक नामे अंकित महेंद्र मोरे वय १७ वर्षे रा. हनुमानवाडी ,चाळीसगाव हा रात्री 01.45 वाजेच्या सुमारास उभा दिसला. अंकित मोरे यावर यापुर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता , ताब्यात घेऊन , त्यास तेथे येण्याचे कारण विचारले असता त्यांना उडवा उडवीचे उत्तरे दिली.

त्याच्यावर संशय बळावल्याने, त्याची अंगझडती आवश्यक असल्याने रात्रगस्त वरिल नाईट चेकींग अधिकारी पोनि संदीप पाटील, वरिल पोलीस स्टाँफ, दोन पंच, अशांना बोलावुन घेतले. पोनि संदीप पाटील यांनी दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे 01 पिस्टल व 05 जिवंत काडतुस, 01 मॅगझिन असा एकूण 75,000/- रु मुद्देमाल मिळुन आला आहे …पो कॉ /2233 निलेश पाटील यांचे फिर्यादीवरून सदर आरोपींवर चाळीसगाव शहर पो स्टे येथे गु.र.नं. 304/ 2024 भारतीय हत्यार कायदा कलम 03, 25 , 29 प्रमाणे दाखल करण्यात आला असून , आरोपीतास अटक करण्यात येऊन पुढील तपास सपोनि दिपक बिरारी करत आहेत ..

सदर विधीसंघर्ष बालक यावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) गुरन क्रमाक 415/2022 भादवि कलम 143,144,147,148,149,324 प्रमाणे
2) गुरन क्रमाक 24/2023 भादवि कलम 302,324,143,144,147,148,149,323 प्रमाणे
3) गुरन क्रमाक 117/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे.


टीम झुंजार