आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल.
यावल : तालुक्यातील पाडळसा या गावात ४५ वर्षीय महिलेने मुलास सांगितले की तू दारूच्या नशेत तुझ्या लहान बहिणीला का मारहाण केली त्याचा राग येऊन २६ वर्षीय मुलाने थेट आईला विट मारून फेकत डोक्यात दुखापत केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात आईने दिलेल्या फिर्यादीवरू मुला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाडळसा ता.यावल या गावात आशाबाई सहदेव भोई वय ४५ या बहिरम नगरात राहतात. त्यांनी त्यांचा मुलगा आकाश सहदेव भोई वय २६ याला सांगितले की तू दारूच्या नशेत तुझी लहान बहीण राणी हिला का मारहाण केली. तेव्हा अशा विचारल्याच्या रागातून आकाश भोई याने त्याच्याच आईच्या डोक्यात वीट मारून फेकली या त्यांच्या डोक्याला दुखापत झाली व त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात आशाबाई भोई यांच्या फिर्यादीवरून आकाश भाेई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेण् पुढील तपास फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.