जळगाव : जळगाव शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येतेय. आज पुन्हा शहरातील शिवाजीनगर हुडकोजवळ तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मोहम्मद मुसेफ शेख इसाक वय-४० रा.हुडको असे मयताचे नाव असून खुनाचे कारण आणि मारेकरी अज्ञात आहे.शहरात काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी झालेल्या दोन खुनांनी उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज जळगावात पुन्हा एकदा खून झाला आहे.
आज शिवाजीनगर हुडको परिसरातील मोहंमद मुसेफ शेख इसाक यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चॉपर हल्ला झाला.यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.