यावल तालुक्यातील 27 वर्षीय तरुणास आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पत्नी व पत्नीच्या प्रियकर विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

Spread the love

यावल :- तालुक्यातील मोहराळा येथील २३ वर्षीय विवाहिता गावातीलच तिच्या २२ वर्षीय प्रियकर सोबत आपल्या एक वर्षीय बाळाला घेऊन पळून गेली होती. याच नैराश्यातून विवाहितेच्या पतीने आत्महत्या केली. तेव्हा या प्रकरणी शनिवारी दिनांक २७ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व या दोघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे.

मोहराळा ता. यावल या गावातील तुषार गोपाळ पाटील वय २८ या तरुणाची पत्नी वैष्णवी तुषार पाटील ही तिच्यासोबत एक वर्षीय बालक समर्थ याला सोबत घेऊन तिचा प्रियकर प्रशांत सहदेव पाटील रा. मोहराळा याच्यासोबत दिनांक १६ जुलै रोजी पळून गेली होती. तेव्हा या प्रकरणी विवाहितेच्या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देखील नोंदवण्यात आली होती. तर तिचे पती तुषार पाटील यांना जेव्हा कळाले की त्यांची पत्नी तिच्या प्रियकरा सोबत पळून गेली आहे तेव्हा ते निराश झालेे आणी या नैराश्यातून त्यांनी १९ जुलै रोजी मोहराळा येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

तेव्हा याप्रकरणी शनिवारी दिनांक २७ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात तरुणाचे वडील गोपाळ शामराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैष्णवी पाटील आणि प्रशांत पाटील या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व या दोघांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार राजेंद्र पवार, हवालदार उमेश सानप करीत आहे.

टीम झुंजार