यावल :- यावल फैजपुर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ एका सेल्समनचे वाहन अडवून त्यास मारहाण करीत दोघांनी ३९ हजार ७०० रूपयांची रोकडे हिसकावली व दुचाकीवरून ते दोघे फरार झाले होते. हि घटना २५ जुलै रोजी रात्री १० वाजेला घडली होती. तेव्हा याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करतांना यावल पोलिसांच्या मदतीने शनीवारी शहरातील आयेशा नगरामधून दोघांना ताब्यात घेतले आहे. व त्यांनी चोरी केलेली रोख रक्कम देखील पोलिसांना काढून दिली आहे.
यावल फैजपूर रस्त्यावर २५ जुलै च्या रात्री दहा वाजता चेतन गोपाल दरेकर हे सेल्समन आपले वाहन क्रमांक एम. एच. १९ सी. एक्स. ०३५० याव्दारे यावल कडे येत होते. दरम्यान हिंगोणा गावाजवळ त्यांचे वाहन दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी आडवले आणि त्यांच्याजवळ असलेली ३९ हजार ७०० रुपयाची रोख रक्कम घेऊन ते फरार झाले. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचर यांच्या मार्गदर्शनाखाली करतांना
पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद व यावल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार असलम खान दिलावर खान यांनी शनीवारी यावल शहरातील आयेशा नगर मधून फरदीन कदीर पटेल व सोहेल रुबाब पटेल या दोघांना ताब्यात घेतले व या दोघांना पोलिसी खाकी दाखवताच त्यांनी या चोरीतील रोख रक्कम ही पोलिसांना काढून दिली. या दोघांना फैजपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या चोरीत वापरलेले दुचाकी चा शोध पोलीस घेत आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.