नवरदेव नवरींना आपलं लग्न आयुष्यभर राहील स्मरणात,काय आहे भानगड तर मग वाचा.
लखनऊ : प्रत्येक लग्नात एक तरी किस्सा असतो, जो आयुष्यभर लक्षात राहतो. एका लग्नातील असाच एक किस्सा, जो नवरा-नवरी काय वऱ्हाडीही कधीच विसरणार नाही. उत्तर प्रदेशात झालेलं हे लग्न. नवरदेव नवरीला आणायला आनंदात गेला.पण तिला घरी आणताना मात्र तो अडचणीत सापडला. नवरीला घरी आणेपर्यंत त्याला घाम फुटला. वऱ्हाडीही हैराण झाले.यूपीच्या हरदोईतल्या या लग्नाची चर्चा सर्वत्र होते आहे, याचं खास कारण आहे. ते म्हणजे या लग्नाची वरात. पाली परिसरातील कहरकोला गावात राहणारा राहुलचं शहाबाद परिसरातील कालागडा गावात लग्न होतं. लग्नमंडपात पोहोचताना त्याच्यासमोर एक अडचण आली. ती कशीकशी त्याने पार केली. पण नंतर नवरीबाईला आपल्यासोबत कसं न्यायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होता.
नेमकं घडलं काय?
इथल्या गररा नदीला पूर आला होता. पाली परिसरातील डझनभर गावं पाण्यात बुडाली. मुख्य रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले. वरासह लग्नातील सर्व पाहुणे हातात पँट घेऊन खोल पाण्यात उतरले आणि कसे बसे लग्नमंडपात पोहोचले.या लग्नाच्या मिरवणूक निघाली ती पाण्यात. लग्नमंडपात जाताना नवरदेव हातात पँट घेऊन पोहोचला. पण आता पुन्हा घरी जाताना सोबत होती ती नवरी. आता तिला कसं काय इतक्या पाण्यातून न्यायचं असा प्रश्न त्याला पडला.
बऱ्याच वेळानंतर बोटीची व्यवस्था
लग्न सुरळीत पार पडलं. पण नवरीला आता घरी घेऊन जायचं कसं असा प्रश्न नवरदेवासमोर होता. आजूबाजूला भरलेलं पाणी पाहून लग्नातील पाहुण्यांसह वधू-वरही तिथं बसले आणि हे पाणी कसं पार करायचे याचा विचार करू लागले. मात्र या समस्येवर कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर काही स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बोटीची व्यवस्था करून दिली. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर बोट सापडली, त्यानंतर वर वधूसह आपल्या घरी पोहोचले.
हे पण वाचा
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.