एरंडोल-नवीन वसाहतीमधील रस्ते, स्वच्छता, जीवघेण्या मरणयातनासह समस्या सोडवा अन्यथा…….

Spread the love


साने गुरूजी, विद्यानगर, अष्टविनायक कॉलनीसह नवीन वसाहतीमधील नागरीक वैतागले- नपासह वरिष्ठांना दिले पुनश्च निवेदन
एरंडोल :- गाव तसं चांगलं पण रस्ते, अस्वच्छता, अवैधधंदे, अतिक्रमणांमुळे वेशीला टांगलं ही आहे आजच्या एरंडोलची अवस्था. चांगले शहर म्हणून आम्ही एरंडोलला (मोठ्या हौसेने घर बांधले परंतू कसले काय ? सुमारे 25-30 वर्षांपासून मरणयातना सहन करून थकलो. त्यामुळे धरणगांव रोडसह सर्वच नवीन वसाहतीतील नागरीक वैतागले असून आता आम्ही सहन करू शकत नाही.

नगरपालिका असून उपयोग तरी काय ? मुलभूत सुविधा (रस्ते, पाणी, गटारी, वीज) नपा जर पुरवू शकत नसेल तर ग्रामपंचायत बरी असे वैफल्यग्रस्त उद्गार परिसरातील (नवीन वसाहती) नागरीकांनी प्रांताधिकारींकडे समस्या मांडून निवेदन देतांना काढले.
धरणगांव रस्त्याकडील सुमारे 30 वर्षांपासून राहणार्‍या विद्यानगर, सोनगुरूजी, अष्टविनायक कॉलनी आणि परिसरातील नागरीकांनी तहसिलदार, प्रांताधिकारी, न. पा. प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यापुर्वी करावयाची (प्राधान्याने) कामे बेजबाबदार ठेकेदाराने न केल्याने जिकडे तिकडे चिखल झाल्याने नपाने मुरूम-कच टाकला नाही.

त्यातच ऐन पावसाळ्यात पक्के (सिमेंट काँक्रीट) रस्ते खोदल्याने लाल, काळी माती रोडवर आल्याने तर त्यात भरच पडली. गटारी नसल्याने अथवा पाण्याचा निचरा न झाल्याने जागोजागी पाणी साचले. पायी चालणे कठीण झाल्याने मुलांना शाळेत पाठविणे देखील कठीण झाले. गॅस सिलेंडरची गाडी फसल्याने डोक्यावर वाहून आणावे लागले. सर्वात जास्त त्रास दवाखान्यात उपचारासाठी जाणार्‍या वृध्दांना, लहान मुलांना नेण्यासाठी त्रासले. रिक्षा घेवू शकत नाही. एक नाही शंभर समस्या….
यापूर्वी नपाकडे तोंडी, लेखी निवेदने दिलीत परंतू शासन, प्रशासनाने दखल घेतली नाही.

म्हणून आमच्या परिसराची स्वतंत्र ग्रामपंचायत करा अशी मागणी (नाईलाजाने) करावी लागली हेही स्पष्ट केले आहे. निदान आता तरी त्वरीत (सात दिवसांच्या आत) दखल घ्यावी अन्यथा परिवारासह उपोषणास बसणार असे नमुद केले आहे.
सदरच्या निवेदनावर मौर्य क्रांती संघाचे अध्यक्ष रविंद्र लाळगे, नारायण बोरसे, अनिल सपकाळे, प्रकाश पाटील, अनिल पाटील, तुकाराम पाटील, पंडीत साळी, रघुनाथ कोठावदे, किरण पाटील, साखरलाल महाजन, तुळशिराम पाटील, राजेंद्र सोनार, अरूण पाटील, दिनेश चव्हाण, नारायण पाटील, भाईदास पाटील, स्वप्निल सावंत, नामदवेराव पाटील, गोरख चौधरी, गोपाल चौधरी, पृथवीराज पाटील, संतोष पाटील, अनिल वाणी, आर. के. सुर्यवंशी, दिलीप सावंत, दिलीप सुर्यवंशी, आर. एन. पाटील, दिनकर पाटील, मधुकर अहिरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टीम झुंजार