यावल :- येथील पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत येऊन पोलिसांना शिवीगाळ करीत त्यांच्याशी वाद घातला. व समजुत काढणाऱ्या पोलिसाची कॉलर पकडून त्याला जमिनीवर ढकलून दिले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल येथील पोलीस ठाण्यात सोमवारी सांयकाळी भरत गणेश सोनवणे वय ३५ रा. वढोदा हा तरुण आला होता. व दारूच्या नशेत त्याने पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेव्हा ठाणे अंमलदार शांताराम तळेले यांनी त्याला वाद घालु नको असे सांगतीले मात्र त्यांनी ऐकले नाही. तेव्हा हवालदार मुस्तफा तडवी याने या तरुणाची समजूत काढली असता त्याने उलट हवलदार मुस्तफा तडवी यांची कॉलर पकडून त्यांच्याशी धक्काबुक्की करत शासकीय गणवेशाचे बटन तोडून त्याला जमिनीवर फेकून दिले.
तेव्हा याप्रकरणी मुस्तफा तडवी यांच्या फिर्यादीवरून भरत सोनवणे यांच्या विरुद्ध शासकिय कामात अडथडा निर्माण करणे सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.