सुमित पाटील प्रतिनिधी :वावडदा ता.जळगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक ०३/०४/२०२२रोजी पार पडली यात रविंद्र कापडणे यांचे नम्रता पॅनल व सरपंच राजेश वाडेकर यांचे शेतकरी राजा विकास पॅनल हे समोरासमोर होते या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत नम्रता पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले यात नम्रता पॅनलचे १३उमेवार विजयी झाले.
यात विजयी उमेदवार यांना मिळालेली मते जनरल मतदार संघ भोळे अनिल बारसु (२४८), राठोड मिश्रीलाल प्रेमा(२४७), पाटील मोतिलाल माधव (२४६), पाटील पोपट फकिरा (२४२), येवले सुधाकर ओंकार (२३८), पाटील संजय रतन (२३५), वंजारी देविदास जालम (२३१), वंजारी हरी पेलाद(२२७) तसेच महिला राखीव मतदारसंघ दोन जागांवर पवार सुमनबाई कौतिक (२४५) पाटील शशीकला प्रकाश (२३१) आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघ पाटील सुरेश विक्रम (२४२) तसेच अनुसूचित जाती जमाती मतदार संघ गवळे अनिल राजु (२२१)व वि.जा.भ.ज.व विमा.प्र.यातुन वंजारी पुरून गणपत (२४४)येणे प्रमाणे नम्रता पॅनलचे सर्व १३उमेदवार विजयी झाले तर प्रतिस्पर्धी शेतकरी राजा विकास पॅनलचे सर्व उमेदवार पराभुत झाले यांत उमेदवार व मिळालेली मते चव्हाण जितेंद्र चैनसिंग (१२३), गोपाळ मिठाराम जुलाल (११५), जाधव भाऊलाल पन्नालाल (१२८), पाटील भानुदास भोमा (१२४), राठोड गंगाराम मखराम (१२१), राठोड मनोहर .भिवा (१२४), राजपूत संजय बाबुराव (१२६), वंजारी हरी सरदार (११८) महीला राखीव मतदारसंघ पाटील कुसुमबाई शांताराम (१३४), वंजारी शांताबाई मोरसिंग (११४) इतर मागासवर्गीय पाटील संजय उत्तमराव (१३६) तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यात हडप गोकुळ बारकु (१३५) व अनुसूचित जाती जमाती मतदार संघ यात वाडेकर राजेश नारायण (१५८)येणे प्रमाणे आहेत
याठिकाणी चुरसीची लढत होईल असे वाटत होते परंतु नम्रता पॅनलने आपले निर्विवाद सर्व उमेदवार विजयी केल्याने कुठेही चुरस बघायला मिळत नाही तसेच विजयी झालेल्या उमेदवारांचे मतातील फरक पाहता कुठेही काठेकी ठक्कर पाहवयास मिळत नाही त्यामुळे हा विजय एकतर्फी दिसत आहे