चंद्रपूर :- सध्याची तरूण पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यांना मोबाईल हेच आपलं जग वाटतं. तासनतास मोबाईलमध्ये गुंग राहणं ही एक आता फॅशन होवून बसले. मोबाईल हातात नसेल तर चुकल्या सारखे वाटणारी आजची तरूण पिढी झाली आहे.या मोबाईलने अनेकांचा घात केला आहे. याच्या अनेक बातम्या आपण पाहील्या आहेत. पण त्यातूनही कोणी शहाणपण घेण्यास तयार नाही. अशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथे घडली आहे. या घटनेने संपुर्ण जिल्हाच हादरून गेले आहे.
या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेच पण मोबाईलसाठी इतकं टोकाचं पाऊल कोणी उचलू शकतं का? अशी चर्चा ही होत आहे.ही सर्वांनात धक्का देणारी घटना चंद्रपूरच्या वरोरा इथे घडली आहे. वायगाव खडतकर या गावात करिष्मा प्रभाकर माने ही तरूणी आपल्या कुटुंबा बरोबर राहते. तिचं वय आहे अवघ वीस वर्षाचे. तिलाही सतात मोबाईलवर बोलण्याची सवय होती. शिवाय सतत मोबाईल हताळणे हा तिचा छंद झाला होता. ती मोबाईल शिवाय एक क्षण राहू शकत नव्हती अशी तिची स्थिती झाली होती.
मोबाईलच्या आहारी जाणे म्हणजे काय असतं हे करिष्मा म्हणजे उत्तम उदाहरण होते.तिच्या घरचेही तिच्या मोबाईल प्रेमामुळे नाराज होते. तिला त्याबाबत वारंवार सांगितलं जातही होतं. पण तिच्यात काही फरक पडत नव्हता. शेवटी करिश्माच्या आईने तिच्या हातून मोबाईल काढून घेतला. आईने मोबाईल काढून घेणे तिला आवडले नाही.
त्याचा तिला प्रचंड राग आला. या रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरातच तिने गळफास घेवून जिवन संपवले. ही बाब घरच्यांनी पाहील्यानंतर त्यांच्या पाया खालची वाळू सरकली. त्यांना काय करावे हे समजलेच नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटना स्थळी पोचले. पोलिस अधिकारी योगेंद्र सिंग यादव या प्रकरणाचा तयार करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






