झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचारीनी संपात सहभाग घेतला एकूण 18 मागण्या साठी वरिष्ठ लिपिक, मंडळ अधिकारी, शिपाई यांनी कामकाज बंद करून संपात सहभाग घेतला
तहसीलदार लिपिक मधून नायक तहसीलदाराची पदोन्नती करण्यात यावी अशा 18 मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आले तहसीलदार कार्यालयासमोर मंडप टाकून विविध घोषणा देण्यात आल्या कार्यालयासमोर प्रांत अधिकारी व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यात लिपिक, मंडळ अधिकारी, शिपाई यांनी बंद पाडला आहे
संपात महसूल कर्मचारी तालुका अध्यक्ष किशोर कृपाचार्य उपविभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर राजपूत किशोर माळी मंडळ अधिकारी मनोज शिंपी, मुकेश यादव कार्यकारणी सदस्य मधुकर नंदनवार, नंदकिशोर वाघ, ज्योती चौधरी, भालचंद्र गवळी, मनोहर राजेंद्र, महेंद्र सुतार, राजेंद्र वाघ, योगेश्री तोंडे, स्मिता महाजन, सविता बर्गे, शिवाजी महाजन, गोपाळ शिरसाट, दिलीप शिंदे, शिपाई नितीन शेंगदाणे, रमेश परदेशी, आनंदा फुलपगार, महेश जोशी इतर महसूल कर्मचारी संपात सहभागी झाले