पीर बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन मुलांच्या पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात बुडून मृत्यू.

Spread the love

पारोळा : भोकरबारी धरणाजवळील पीर बाबांचे दर्शन घेऊन पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (ता.३) सायंकाळी चारच्या सुमारास तालुक्यातील वंजारी शिवारात असलेल्या भोकरबारी धरणाजवळ घडली. तिघेही मृत पारोळा शहरातील रहिवासी आहेत. इतर दोघे पाण्यात न उतरल्याने ते बचावले. शहरातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (वय १६), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय १४), आश्रम पीर मोहम्मद (वय नऊ), इब्राहिम शेख अमीर (वय १४, सर्व रा. बडा मोहल्ला, पारोळा), आवेश रजा शेख मोहम्मद (वय १७, रा. मालेगाव जि. नाशिक),

हे पाचही जण आज शनिवारी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास शहरापासून चार किलोमीटरवरील भोकरबारी धरणाच्या काठावरील पीर बाबांच्या दर्शनासाठी गेले.दर्शनानंतर त्यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज, इजाज रजा न्याज मोहम्मद व आवेश रजा शेख मोहम्मद हे तिघे धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे पाचपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. परंतु, केवळ खेळण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ तिघे बुडाले. काठावर उभे असलेले आश्रम पीर मोहम्मद, इब्राहिम शेख अमीर यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता, त्यात यश आले नाही.

दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेत घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. बचाव कार्यात पंकज पाटील, प्रवीण पाटील, गौतम जावळे, करण लोहार, रवी खंडारे, विजय महाजन, अंकित राजपूत यांनी सहकार्य केले.कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनतिघांचे मृतदेह पारोळा येथील कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय डॉ. प्रशांत रनाडे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. गिरीश जोशी, मंगला त्रिवेणी, दीपक पाटील, प्रमोद सूर्यवंशी, प्रेम वानखडे यांनी शवविच्छेदन केले.

हे पण वाचा

टीम झुंजार