महसूल दिनाच्या निमित्ताने एरंडोल येथे रक्तदान शिबिरात २५ जणांनी केले रक्तदान.

Spread the love


प्रतिनिधी | एरंडोल
येथे महाराष्ट्र शासनाच्या सूचने नुसार १ ऑगस्ट हा महसूल दिन व १ ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत अाहे. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यात तहसीलदार सुचिता चव्हाण, निवासी तहसीलदार संजय धुतले, नायब तहसीलदार दिलीप पाटील समवेत तहसील कार्यालयातील भूषण म्हस्के, सलमान तडवी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी स्वतः प्रथम रक्तदान करून आपल्या सर्व सहकाऱ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे आता वागवे ठरणार नाही.

वेळेवर रक्तदान केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि निरोगी प्रौढांमध्ये तंदुरुस्ती वाढते.नियमित रक्तदान केल्याने लोहाची पातळी कमी राहते आणि त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्तदान हेच जीवनदान आहे .रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे, मग ते कुणाहीसाठी असो. असं प्रतिपादन तहसीलदार सुचिता चव्हाण रक्तदान शिबिरात केले.

हे पण वाचा

टीम झुंजार