भरधाव वेगाने दुचाकीस धडक देवून अपघातातून पलायन करणाऱ्या पिकअप वाहनचालकास PSI यांनी पाठलाग करून घेतले ताब्यात.

Spread the love

चाळीसगाव :- काल दिनांक 02/08/2024 रात्रौ 11/15 वाजेच्या सुमारास एक पिकअप वाहन चालकाने भरधाव वेगाने निष्काळजीपणे मालेगाव कडून – चाळीसगाव कडे येत असताना चाळीसगाव -मालेगाव रोड वर स्थित हॉटेल चंद्रा समोरील रोडवर एक चाळीसगाव कडून मालेगाव दिशेने जाणाऱ्या हिरो होंडा करिज्मा मोटर सायकल क्र . MH 15 DN 2080 वरिल चालकास जोराने ठोस दिली ..धडक एवढ्या जोरात होती कि , मोटार सायकल चालकाचे डोक्यास मार लागून जागीच मयत झाला ..अपघात करून पिकअप चालक याने वाहन न थांबवता चाळीसगाव दिशेने पिकअपसह पळ काढला .

अपघाताचा आवाज आल्याने हॉटेल चंद्रा चे मालक श्री राहुल पवार , स्टाफ व गिऱ्हाईक रोड चे दिशेने धावले ..गिऱ्हाईकांमध्ये जेवणाची वाट पाहत असलेले चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे मित्र श्री प्रितेश कटारिया रा चाळीसगाव हे सुद्धा अपघाताच्या आवाजाने रोडच्या दिशेने धावले .. मोटर सायकल स्वार जागीच मृत लक्षात आल्याने व अपघात करणारा पळून गेलेला पिकअप ताब्यात घेणे गरजेचे असल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी श्री प्रितेश कटारिया यांना त्यांचे खाजगी वाहन काढून सदर पिकअप पकडणेकामी कामी मदत मागितली .त्यांनीपण लागलीच होकार देऊन स्वतः प्रितेश कटारिया वाहन चालवण्यास बसून चाळीसगाव दिशेने पिकअप पकडण्यासाठी निघाले …..

दरम्यानचे काळात चंद्रा हॉटेल ला देवळी गावातील लोक जेवणासाठी आले होते त्यांनीसुद्धा फोन करून गावातील तरुणांना अपघाताची माहिती देऊन पिकअप पकडण्यासाठी सांगितले .देवळी गावातील तरुणांनी तात्काळ प्रतिसाद देत रोडवर येऊन पिकअप पकडण्याचा प्रयत्न केला परंतु पिकअप चालकाने त्यांचे इशाऱ्यास न जुमानता भरदाव वेगात आपले पिकअप क्र MH 06 BN 0267 आणल्याने , तरुणांना पिकअप अडवता आला नाही . पिकअप चाळीसगाव दिशेने निघाला मागावर असलेल्या पोलीस निरीक्षक संदीप पाटील व प्रितेश कटारिया यांना देवळी गावातील तरुणांनी वरील हकीकत सांगितल्यावर

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी चाळीसगाव शहर पो स्टे चे रात्रौ गस्त वरील अंमलदार श्री विश्वास पाटील , अजय पाटील , शरद पाटील , मोहन सूर्यवंशी , गणेश कुंवर , नंदू महाजन याना अपघात बाबत माहिती देऊन पिकअप क्र MH 06 BN 0267 पकडण्यासाठी मालेगाव रोड वरिल बिलाखेड बायपास येथे तात्काळ नाकाबंदी लावणेकामी आदेशित करून स्वतः प्रितेश कटारिया यांच्यासोबत पिकअप शोधासाठी निघाले ..मालेगाव रोड वरिल बेलगंगा साखर कारखान्याजवळ अपघात करून जाणारा पिकअप क्र MH 06 BN 0267 त्यांना दिसला ..सदर पिकअप चालकास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी थांबण्याचा इशारा केला असता ,

त्याने आपला वेग वाढवून इशाऱ्यास जुमानले नाही .सदर पिकअप चालक थांबत नसल्याने पाहून प्रितेश कटारिया यांनी आपले वाहनाचा संयमाने वेग वाढवून , नियंत्रण ठेवून पिकअप पेक्षा जास्त वेगाने वाहन चालवून त्यास थांबणे कामी मजबूर केले ..सदर पिकअप वाहन चालकाने पीकपचा वेग कमी करून थांबवले ..संदीप पाटील यांनी त्यास पळून जाण्याची संधी न देता , त्यांची ओळख देऊन त्यास ताब्यात घेतले ..तेव्हा त्याने अपघाताची कबुली देऊन स्वतःची ओळख रिहान उर्फ अब्बू अली सय्यद अली रा नागरदेवळा , ता पाचोरा जि जळगाव दिली ..व ओळख पटू नये तसेच लोक मारतील या भीतीने अपघात स्थळावरून पळ काढल्याचे सांगितले ..

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी चाळीसगाव चे वरिल स्टाफ ला बोलवून पिकअप चालकास वाहनासह मेहुणबारे पोलीस स्टेशनला जमा केले आहे ..अपघाताचे साक्षीदार हॉटेल चंद्रा चे मालक श्री राहुल पवार यांचे तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून करिज्मा मोटर सायकल क्र . MH 15 DN 2080 वरिल मयत चालकाची ओळख पटवणे चालू आहे ..पिकअप चालकास पकडणे कामी मदत करणारे श्री प्रितेश कटारिया तसेच अडवण्याचा प्रयत्न करणारे देवळी गावातील ग्रामस्थांचा पोलीस स्टेशन तर्फे लवकरच सत्कार करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली असून त्यांचे पोलिसांना मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार