जळगाव ग्रामीण प्रतिनिधी (सुमित पाटील) :- जळगाव तालुक्यातील वावडदे म्हसावद परिसरातील जळके विटनेर रामदेव वाडी वसंत वाडी तांडा लमाजन कुराडदे वाकडी वडली पाथरी डोमगाव म्हसावद या १६ खेडया गावांसह गावठी दारू दारु सट्टा पत्ता अवैधरीत्या रेती वाहतुक यासह गावातील तरुण सुशिक्षित बेरोजगार मुलं व्यसनाधीन होताना दिसत आहे . याबाबत स्थानिक प्रशासन कठोर पाऊल उचलताना दिसत नाही. मागील वर्षी वावडदे ग्रुप ग्रामपंचायत यांनी 300 महिलांचे ग्रामपंचायत ठराव केलेला होता व हा ठराव संबंधित सर्व अधिकारी यांना देण्यात आलेला होता
ह्या ठराविषयी सर्व अधिकारी यांनी केळाची टोपी लावल्याची दिसत आहे फक्त हप्त्यांची वसुली होऊ द्या दोन नंबर धंदे चालू द्या अशी अवस्था दिवसेंदिवस या अवैध धंदे होताना दिसत आहे. याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी कारवाई करते की नाही…याबाबत परिसरातील ग्रामस्थांचं सह सामाजिक कार्यकर्ते लक्ष वेधले जाणार आहे…बाहेर गावातली व्यक्ती वावडदा येथे सत्ता पिढीचे मालक म्हणून वावडदा 13 गावांतील परिसरातील सट्टा पिढी पत्ता चालून लाखो रुपये कमवत आहे ही पिढी वावडदे सह परिसरातुन हद्दपार होत नाही तरी. वावडदे ग्रामस्थ यांची मागणी ही सट्टा पिढी गावातून व परिसरातुन हद्दपार व्हावी अशी मागणी वावडदे सह परिसरातील नागरिकांनी करीत आहे..
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम