अहमदनगर :- एका विवाहितेस राहुरीतून अपहरण करत श्रीरामपुरात आणले. तेथे तिच्यावर दमदाटी करत अत्याचाहर करण्यात आला. या घटनेबाबत वाच्यता केल्यास जावयांना सांगून मुलींचा संसार मोडेल अशी धमकी दिली गेली.या विवाहितेवर पाच दिवस अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पिडितेच्या तक्रार दिली आहे.त्यावरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक नानासाहेब सोनवणे (रा. वडाळा महादेव, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता पतीशी वाद झाल्याने ती माहेरी राहत होती.
अधिक माहिती अशी :
राहुरी तालुक्यातील ३४ वर्षीय महिला लग्नानंतर श्रीरामपुर तालुक्यात पतीसोबत राहत होती. दरम्यानच्या काळात पती-पत्नीत बिनसले. त्यामुळे ती सासर सोडून माहेरी आली. दोन वर्षापासून ओळख असलेल्या कार्तिकसोबत सहा महिन्यापूर्वी तिचे प्रेमसंबंध जुळले.९ जून रोजी ही विवाहिता राहुरीत आली होती. कार्तिकही तेथे पोहचला. त्याने तिला बसस्थानक परिसरात बोलावून घेतले. तेथे ‘येथे माहेरी काय करते, माझ्यासोबत चल, मी तुझ्याशी लग्न करतो सुखात ठेवेल’, असे गोड बोलून तिला चारचाकी वाहनातून श्रीरामपुरात आणले.गोंधवणी येथे दमबाजी करत सलग ५ दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
इच्छेविरुध्द झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा बोभाटा केला तर तुझ्या जावयांना सांगून मुलींचा संसार मोडेल अशी धमकी दिली.दरम्यान राहुरी पोलिसांत विवाहिता गायब असल्याची तक्रार दाखल झाली होती. राहुरी पोलिसांनी शोध घेवून पिडितेचा छडा लावला. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. पिडितेच्या तक्रारीवरून राहुरी पोलिसात कार्तिक सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम