कराड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका युवतीचा कराड लगतच्या मलकापूर येथे इमारतीवरून ढकलून देवून खून करण्यात आला आहे. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले असून संबंधित प्रियकरास कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे.हे दोघेही कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते.आरूषी सिंग (वय २१, रा. झुरण छपरा रोड नंबर ३, मुजफ्फरनगर एमआयटी मुजफ्फरनगर राज्य- बिहार) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.
तर ध्रुव राजेशकुमार छिक्कारा (वय २१, रा. घर नंबर ६८४, गल्ली नंबर १, अशोक विहार गोहाना रोड सोनीपत राज्य- हरियाणा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिप्ती सिंग (वय ४८, रा. झुरण छपरा रोड नंबर ३, मुजफ्फरनगर एमआयटी मुजफ्फरनगर राज्य- बिहार) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संशयित आरोपी ध्रुव छिक्कारा याने आरूषीला मलकापूर येथील तो राहात असलेल्या इमारतीमध्ये बोलावले.
येथे आल्यावर त्यांच्यात वाद झाला. तुझे दुसऱ्या मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याने तिला इमारतीवरून ढकलून दिले. यामध्ये आरूषीचा मृत्यू झाला तसेच या वेळी पडल्याने ध्रुवही जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करून पोलिसांनी गुरूवारी त्याला अटक केली आहे.दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील हे तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






