राजकीय वर्तुळात खळबळ…ब्रेकिंग न्यूज; ईडी कळुन शिवसेना नेते संजय राऊत यांची संपत्ती जप्त

Spread the love

मुंबई,- शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याचे समोर आले आहे. दरम्यान संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आल्याचं समजतं. आज ईडी कडून ही मोठी कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

‘या’ संपत्तीवर सिल..

खासदार संजय राऊत यांच्या अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आला असून पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ…

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या कार्यपद्धतीवर व अधिकाऱ्यांविरुद्ध जाहीरपणे बोलून जोरदार टीका करत होते. आज ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

.

टीम झुंजार