लाडकी बहीण’ योजनेच्या बहाण्याने पतीसोबत आली, पतीला पाठवलं मुलाला खाऊ घेण्यासाठी, मुलाला घेवुन पत्नी प्रियकरासोबत फरार.

Spread the love

नांदेड :- सध्या संपूर्ण राज्यभरात शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची लगबग सूरू आहे. कागदपत्रांसाठी कुणी माहेरी जातंय तर कुणी सासरीच कागदपत्र गोळा करत आहे.या योजनेचे पैसे बँक खात्यात मिळणार आहेत. यासाठी बँक खात्याचे केवायसी करणे आवश्यक आहे. एक विवाहित महिला केवायसी करण्यासाठी बहाण्याने बँकेत आली अन् प्रियकरासोबत पळून गेली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही घडली आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याला आली होती. तालुक्याच्या बँकेत तिचे खाते होते. या खात्याच्या केवायसीचे काम करण्यासाठी ही महिला आपल्या अडीच वर्षाच्या मुलासोबत आली होती. महिलेचे माहेर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहे. 2017 साली महिलेचा विवाह झाला होता. त्यानंतर महिला पतीच्या नोकरीच्या निमित्ताने सासू-सासऱ्यांपासून वेगळं राहू लागली होती. मात्र या महिलेच्या डोक्यात वेगळाच प्लान सुरु होता.

महिलेने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचं ठरवलं. त्यासाठी ती पती आणि मुलासोबत हादगावला आली. ठरल्या प्रमाणे प्रियकर देखील हादगावला आला. महिला लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करायला बँकेत पोहोचली. बँकेत बरीच गर्दी होती, त्यामुळे वाट पाहावी लागणार होती. अखेर महिलेने पतीला मुलासाठी खाऊ आणायला पाठवले. पती खाऊ आणायला जाताच ती प्रियकरासोबत गायब झाली. पती खाऊ घेऊन परत आला तर त्याला पत्नी आणि मुलगा दोघेही दिसले नाही.

बरीच शोधाशोध केल्यानंतरही त्याला काहीच माहिती मिळाली नाही. अखेर हदगाव पोलीस ठाणे गाठून त्याने तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि महिलेला शोधून काढले. त्यावेळी तपासात पोलिसांना धक्काच बसला. कारण महिला स्वइच्छेने आपल्या प्रियांकासोबत पळून गेली होती. पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार