मुंबईच्या गोरेगाव भागामध्ये पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. सेल्समन पतीने फिजिओथेरपिस्ट पत्नीची हत्या करून मग स्वत: जीवन.
मुंबई :- मुंबईच्या गोरेगाव भागामध्ये पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. सेल्समन पतीने फिजिओथेरपिस्ट पत्नीची हत्या करून मग स्वत: जीवन संपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणात पती किशोर पेडणेकर तणावात असल्याचा संशय पोलिसांना आहे.मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावच्या इमारतीमध्ये पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर असं मृतदेह आढळून आलेल्या पती-पत्नीचं नाव आहे. या घटनेतील पत्नीचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये तर पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात आढळून आला आहे.
किशोर पेडणेकर यांनी त्यांची पत्नी राजश्री यांची गळा आवळून हत्या करून मग इमारतीवरून उडी मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.गोरेगावच्या टोपीवाला कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला आहे. किशोर पेडणेकर हे उडी मारून पडल्याचं समजल्यानंतर तिकडे पोलीस आले. पोलिसांना त्यांच्या खिशात घराच्या चाव्या आढळल्या, यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिलं असता त्यांच्या पत्नी राजश्री यांचा मृतदेह घरामध्ये होता. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
नातेवाईकाला दिली मालमत्तेची माहिती
बिल्डिंगवरून उडी मारण्याआधी किशोर पेडणेकर यांनी एका नातेवाईकाला मेसेज करून त्यांची बँक खाती, मालमत्ता आणि नॉमिनीबाबत माहिती दिली. तसंच फ्लाईटचं तिकीट पाठवून दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मुलाला रात्री 9 वाजेपर्यंत घेऊन येण्यास सांगितलं. यानंतर किशोर पेडणेकर यांनी स्वत:च्या पत्नीला संपवलं आणि मग स्वत: उडी मारली.गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री पेडणेकर या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट होत्या. पोलिसांनी याप्रकरणी किशोर आणि राजश्री यांच्या मुलाला मुंबईमध्ये जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. किशोर पेडणेकर हे डिप्रेशन आणि इतर काही आजारांनी त्रस्त होते, तर राजश्री पेडणेकर मालाडमधल्या आरोग्य संस्थेत प्रॅक्टिस करत होत्या.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४