छत्रपती संभाजीनगर:- शासनानं महिलांसाठी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एका महिल एजंटवर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे पैसे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे, निर्देश नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.छत्रपती संभाजीनगर इथं हा प्रकार घडला आहे.लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना म्हस्के या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना मस्के ही प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष असल्याचं लेटर हेड वापरते. या पदावरून तिनं यापूर्वीच उपोषणाचा इशारा दिला होता. शिवाय याच लेटरहेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत असते.वंदना म्हस्के ही गरीब महिलांना लुटत असल्याची तक्रार काही महिलांनी तहसीलदारसमोर केली होती, त्यानंतर या महिलांचे जबाब नोंदवून घेत तहसिलदारांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
अनुदान मंजूर करण्यासाठी, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी वंदना मस्के ही गोरगरीब महिलाकडून पैसे उकळत होती. पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी म्हस्के यांच्याकडं विचारणा केली असता ही महिला धमक्या देत असल्यानं महिलांनी तहसीलदारांकडं धाव घेतली होती.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४